Happy Ganesh Chaturthi! गणपति बप्पा मोरिया
——————————🌿
श्रीगणेश एकदंत
*एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि |*
*तन्नो दन्ती प्रचोदयात् |*🌱🌱
‘आम्ही एकदन्ताला जाणतो. त्या वक्रतुण्डाचे आम्ही ध्यान करतो. तो एकदन्त आम्हाला प्रेरणा देवो.’
*या गायत्री मंत्रामध्ये ‘एकदन्त’ शब्दामध्ये ‘एक’ शब्द मायावाचक असून ‘दन्त’ शब्द सत्तावाचक आहे. या दोघांचा संयोग म्हणजे एकदन्त होय.* एक शब्दाने निर्देशित केलेल्या मायेचा सत्ताधीश म्हणजे मायाधीश किंवा मायाधिपति परमेश्वर होतो. तो श्रीगणेशस्वरूप असून तो सगुण ब्रह्मस्वरूप आहे. त्याला आम्ही जाणतो.
*‘एक’ )*शब्द मायावाचक असून त्या मायेमधून सर्व ‘जगत’ उत्पन्न झालेले आहे. ती माया भ्रान्तीला उत्पन्न करून मोह निर्माण करणारी आहे आणि नाना प्रकारच्या जगताच्या रूपाने खेळ-क्रीडा करणारी असून पूर्ण आहे. म्हणून मायेचे पहिले कार्य विश्व निर्माण करणे व दुसरे कार्य जीवांच्या बुद्धीवर मोहाचे आवरण घालून अनेक प्रकारची भ्रान्ति निर्माण करणे होय. ही भ्रान्ति अनंत अपार तऱ्हेने करून अगणित प्रकारे विश्वामध्ये क्रीडा करणारी आहे.
*‘दन्त’* स्वरूप सत्तावाचक असून मायेचा स्वामी सत्ताधारण करणारा, मायेला स्वतःच्या अधीन ठेवणारा मायेचा चालक मायाधीश आहे. तोच मायाधिपति प्रतिबिंबरूपाने मायेच्या उपाधीमुळे जीवरूपाला येतो आणि संसारी बनतो. परंतु स्वतः मात्र मायेपासून अलिप्त राहून स्वस्वरूपाच्या स्वानन्द स्वरूपामध्ये रममाण असतो.
म्हणून जीव साक्षात परब्रह्मस्वरूप असूनही अज्ञानजन्य भ्रान्तिप्रत्ययामुळे जन्ममृत्यूरूपी संसारात अडकतो. परंतु परब्रह्मस्वरूप मात्र जीवामध्ये कूटस्थअसंगचिद्रूपसाक्षीचैतन्यस्वरूपाने असंसारी रूपाने राहाते. अशा ‘एकदन्त’ मायाधिपति श्रीगणेशाला जाणणे हेच भक्ताचे कर्तव्य आहे. तोच पुरुषार्थ आहे.
_श्री गणपति अथर्वशीर्ष” या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,_
=======================📕
*श्रीधर कुलकर्णी :*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*